BNR-HDR-TOP-Mobile

Lonand : पुण्यातील चप्पल व्यापा-याची दोन कोटीच्या खंडणीसाठी गोळ्या घालून हत्या

एमपीसी न्यूज – पुण्यातील चप्पल व्यापा-याचे दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून गोळ्या घालून हत्या करण्यात आली. साता-यातील लोणंद जवळील पाडेगाव येथे ही घटना घडली. आज रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.  

चंदन कृपादास शेवानी (वय ४८, रा. पारमार पॅराडाईझ, साधु वासवानी, बंडगार्डन), असे या व्यापा-याचे नाव आहे. त्यांच्या बहिणीने शनिवारी रात्री बंडगार्डन पोलिसांकडे बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती. खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथील पाण्याच्या कॅनॉलजवळ चंदन शेवानी यांचा मृतदेह शनिवारी रात्री आणून टाकला असल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले. ‘२ सीआर नही दिये, इसके लिये गया, भाई के ऑर्डर पे ठोकणा पडा’, असा मजकूर लिहिलेली चिठ्ठी त्यांच्या खिशात मिळाली आहे.

शेवानी यांचा चप्पल विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्या कुटुंबियांनी शनिवारी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. ते घरीही नव्हते. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे हरविल्याची तक्रार दिली. दरम्यान, सातारा पोलिसांना पाडेगाव येथे एका व्यक्तीचा मृतदेह रविवारी सकाळी आढळून आला़. त्याच्या छातीत गोळ्या घालून खून करण्यात आला होता. त्याची ओळख पटविण्यासाठी सातारा पोलिसांनी सर्वत्र त्याचे फोटो पाठविले. त्यातून बंडगार्डन पोलिसांकडे मिसिंग दाखल असलेल्या चंदन शेवानी यांचा तो मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले.

या घटनेनंतर पुणे पोलीस साता-याला रवाना झाले आहेत. मात्र, शेवानी यांच्या कुटुंबियांना खंडणीसाठी कोणाचाही फोन आला नसल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like