Pune : स्मार्ट सिटीचे प्रकल्प शहरभर राबविणार ; स्थायी समितीची मान्यता

एमपीसी न्यूज : स्मार्ट सिटी योजने अंतर्गत औंध बाणेर-बालेवाडी भागात राबविले जाणारे प्रकल्प आता संपूर्ण शहरभर राबविण्यात येणार आहेत. स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

स्मार्ट सिटीकडून शहरात ‘स्मार्ट एलिमेंट फेज-२’ तसेच मोफत वाय-फाय, ई-कनेक्टिविटी हे प्रकल्प औंध बाणेर भागासाठी राबविण्यास मान्यता दिली आहे. त्यात स्मार्ट बसस्थानके, स्मार्ट टॉयलेट, स्मार्ट पोल, प्रदूषण सेन्सर्स याचा समावेश आहे. त्याच धर्तीवर पुणे शहरातही या योजना राबविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत होता. या शिवाय, स्मार्ट सिटीकडून या भागासाठी श्री-डी मॉडेलिंग स्टडी विथ सेट मॅपिंगचे कामही हाती घेण्यात आले आहे. ही दोन्ही कामे शहरात इतरत्रही करण्यात यावी अशी मान्यता स्थायी समितीने दिली आहे असल्याचे अध्यक्ष योगेश मुळिक यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.