Pune : स्मार्ट सिटी वॉर रुमचे शरद पवार यांच्याकडून कौतुक

Smart City War Room appreciated by Sharad Pawar

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या पुणे स्मार्ट सिटी वॉर रुमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज, शुक्रवारी कौतुक केले.

पुणे महानगरपालिकेने विकसित केलेल्या पुणे स्मार्ट सिटी वॉर रूमला पवारांनी आज भेट दिली. या याठिकाणी उभारलेल्या अत्याधुनिक संगणकीय प्रणालीची कार्यपद्धती त्यांनी जाणून घेतली. त्यानंतर श्री पवार यांनी या वॉर रुमचे कौतुक केले.

या प्रणालीद्वारे शहरातील कोरोनाबाधित क्षेत्र, रुग्ण, वाढत्या परिसराची अद्ययावत माहिती उपलब्ध होत असल्याने उपाययोजना करण्यास मदत होते. कोरोनाच्या संकट काळात दिशादर्शक म्हणून ही वॉर रूम काम करीत असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

यावेळी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड आणि अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी कोरोना संदर्भात करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी PMCPune कॉफी टेबल बुक भेट देऊन शरद पवार यांचे स्वागत केले.

यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे उपस्थित होते. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या वॉर रूमची माहिती घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.