Pune : काळवीट व हरणाच्या कातड्याची तस्करी करणाऱ्या दोन जणांना अटक

एमपीसी न्यूज- काळवीट व हरणाच्या कातड्याची तस्करी करणाऱ्या दोन जणांना पुणे वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अटक केली त्यांच्याकडून काळवीट व हरणाची तीन कातडी हस्तगत करण्यात आली. ही कारवाई कात्रज घाटामध्ये भिलारेवाडी येथे करण्यात आली.

दीपक सुभाष कुलकर्णी व गणेश लहू पवार अशी या प्रकरणी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून काळवीट व हरणाची तीन कातडी आणि गुन्ह्यात वापरलेली सॅन्ट्रो कार जप्त करण्यात आली. या प्रकरणी वनपाल खेड शिवापूर एस एस बुचडे व एस.एस. खेडेकर यांनी फिर्याद दाखल केली. आरोपीना न्यायालयात हजार केले असता दोघांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

ही कारवाई मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, उपवनसंरक्षक श्रीमती श्रीलक्ष्मी ए यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक संजय मारणे यांच्या नेतृत्वाखाली भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी मुकेश सणस, दीपक पवार यांच्या पथकाने केली. या कारवाईत मनोज पारखे, अनिल राठोड, रवी मगर या वनसंरक्षकांनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.