Snooker Championship : स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या शिवम अरोराला विजेतेपद

एमपीसी न्यूज: द क्यू क्लब तर्फे आयोजित स्टरलाईट टेक अखिल भारतीय खुली स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या शिवम अरोरा याने योगेश कुमार याचा 5-2 असा पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.(Snooker Championship) वडगांव-शेरी येथील द क्यू क्लबमध्ये झालेल्या स्पर्धेच्या मुख्य ड्रॉच्या अंतिम फेरीत शिवम अरोरा याने हा विजय मिळवला.

सामन्याची पहिली फ्रेम 72-25 अशी जिंकून योगेशने धडाक्यात सुरूवात केली. शिवम अरोराने दुसरी फे्रममध्ये 69-18 अशी जिंकून 1-1 अशी बरोबरी निर्माण केली. तिसरी, चौथी आणि पाचवी फ्रेम जिंकून 70-60, 84-22, 72-52 अशी सामन्यात 4-1 अशी आघाडी घेतली. 75-61 अशा गुण फरकाने सहावी फ्रेम जिंकत योगेशने 2-4 अशी आघाडी कमी केली. सातवी फ्रेम 66-21 अशी जिंकून शिवमने 5-2 असा सामना जिंकत विजेतेपद संपादन केले.

उपांत्य फेरीमध्ये शिवम अरोरा याने पुष्पेंद्र सिंग याचा 63-67(67), 13-89, 78-06, 69-20, 51-68, 72-36, 78-28 असा पराभव केला.(Snooker Championship) योगेश कुमार याने इशप्रीत सिंग चढ्ढा याचे आव्हान 62-53, 91-20, 100(30, 70)-09, 75-29 असे मोडून काढत अंतिम फेरी गाठली होती.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्टरलाईट टेकचे अध्यक्ष प्रवीण अगरवाल यांच्या हस्ते करण्यात आले.(Snooker Championship) यावेळी स्पर्धेचे संचालक आणि द क्यू क्लबचे संचालक अलेक्स रेगो, मुख्य रेफ्री राजीव खांडके, सहभागी खेळाडू, मान्यवर उपस्थित होते. विजेत्या शिवम अरोरा आणि उपविजेत्या योगेश कुमार यांना करंडक आणि पारितोषिके देण्यात आली.

Chandrakant Patil : चंद्रकांत पाटीलच पुण्याचे पालकमंत्री ?

सामन्यांचे निकालः मुख्य ड्रॉः उपांत्य फेरीः
शिवम अरोरा वि.वि. पुष्पेंद्र सिंग 4-3 (63-67(67), 13-89, 78-06, 69-20, 51-68, 72-36, 78-28);
योगेश कुमार वि.वि. इशप्रीत सिंग चढ्ढा 4-0(62-53, 91-20, 100 (30, 70)-09, 75-29);
अंतिम सामनाः शिवम अरोरा वि.वि. योगेश कुमार 5-2 (25-72, 69-18, 70-60, 84-22, 72-52, 61-75, 66-21);

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.