Snooker Competition: स्टरलाईट टेक अखिल भारतीय खुली स्नुकर अजिंक्यपद स्पर्धा 2022 !

एमपीसी न्यूज: द क्यु क्लब तर्फे आयोजित स्टरलाईट टेक अखिल भारतीय खुली (Snooker Competition) स्नुकर अजिंक्यपद स्पर्धेत शिवम अरोरा, पुष्पेंद्र सिंग, दिलीप कुमार, इशप्रीत सिंग चढ्ढा, योगेश कुमार, क्रिश गुरबक्शानी, शहाबाज खान, आर. गिरीष यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून स्पर्धेच्या उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला आहे.

वडगांव-शेरी येथील द क्यु क्लबमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेच्या मुख्य ड्रॉच्या उप-उपांत्यपुर्व फेरीत शिवम अरोरा याने पियुष खुशवाह याचा 68-23, 71(54)-45, 59-34 असा सरळ फ्रेममध्ये पराभव केला.आपल्या विजयात शिवम याने 54 गुणांचा बे्रकही नोंदविला. पुष्पेंद्र सिंग याने आपली विजयी कामगिरी कायम ठेवताना तहा खान याचा 62-29, 37-71, 77-48, 76-33, 70-35 असा संघर्षपूर्ण पराभव केला.अतितटीच्या सामन्यात दिलीप कुमार याने विजय निचानी याचा 16-60, 70(32, 20)-10, 57-45, 69-(30)-32 असा पराभव केला.

 

CWG 2022 : पीव्ही सिंधूने रचला इतिहास;भारताला 19 वे सुवर्ण

इशप्रीत सिंग चढ्ढा याने आपली विजयी घौडदौड कायम ठेवताना अमी कमानी याच्यावर 51-55, 60-55, 09-69, 98(51)-05, 63-35 असा संघर्षपूर्ण विजय नोंदविला. योगेश कुमार याने नामांकित खेळाडू हसन बदामी याचे आव्हान 64-7, 75-15, 62-55, 60-25 असे संपुष्टात आणले. (Snooker Competition)  क्रिश गुरबक्शानी याने अनपेक्षित निकाल नोंदविताना फैझल खान याचा 90(77)-19, 04-71(65), 42-72, 72-42, 68-56 असा पराभव केला.आपल्या या विजयात क्रिश याने 77 गुणांचा बे्रक नोंदविला. शहाबाज खान याने सुमित अहुजा याचा 80-43, 25-52, 08-64, 62-59, 72-35 असा तर, आर. गिरीष याने इ. पांडूरंग घईया याचा 65-32, 43-67, 57-34, 63-45 असा पराभव करून उपांत्यपुर्व फेरी गाठली.

सामन्यांचे निकालः मुख्य ड्रॉः उप-उपांत्यपुर्व फेरीः
पुष्पेंद्र सिंग वि.वि. तहा खान 62-29, 37-71, 77-48, 76-33, 70-35;
दिलीप कुमार वि.वि. विजय निचानी 16-60, 70(32, 20)-10, 57-45, 69-(30)-32;
इशप्रीत सिंग चढ्ढा वि.वि. अमी कमानी 51-55, 60-55, 09-69, 98(51)-05, 63-35;
योगेश कुमार वि.वि. हसन बदामी 64-7, 75-15, 62-55, 60-25;
क्रिश गुरबक्शानी वि.वि. फैझल खान 90(77)-19, 04-71(65), 42-72, 72-42, 68-56;
शहाबाज खान वि.वि. सुमित अहुजा 80-43, 25-72, 08-64, 62-59, 72-35;
आर. गिरीष वि.वि. इ. पांडूरंगघईया 65-32, 43-67, 57-34, 63-45;
शिवम अरोरा वि.वि. पियुष खुशवाह 68-23, 71(54)-45, 59-34;

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.