Pune : तर 2024 मध्ये मोदी-शाहांना तुरुंगात टाकू; प्रकाश आंबेडकरांचे वादग्रस्त वक्तव्य

एमपीसी न्यूज : 2024 मध्ये भाजप सोडून (Pune) इतर पक्षाचे सरकार आले तर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना तुरुंगात टाकण्याचे वादग्रस्त वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. आज खडकवासला मतदार संघातील कोल्हेवाडी परिसरात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची सभा पार पडली. या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली.

Nigdi News : ‘नारीशक्ती दिना’ला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ते म्हणाले, की गैरभाजप आणि आरएसएसचे सरकार सत्तेत आले तर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. झुकानेवाला चाहिये, सरकार उसके सामने झुकती है… 2024 मध्ये यांना झुकावं लागेल, हेच आव्हान मी देतोय असे प्रकाश आंबेडकर यांनी उद्गार काढले.

तसेच त्यांनी मोदींनंतर दुसरा पंतप्रधान कोण? नंतरचा (Pune) उत्तराधिकारी कोण? आता एकही माणूस आपल्या नजरेत नसल्याचे त्यांनी म्हंटले. महाराष्ट्रात नव्हे इतर राज्यात देखील हीच परिस्थिती असल्याचे भाष्य त्यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.