Pune : तर, भारत विकसित राष्ट्र बनेल – डॉ. अडसूळ

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारने जाहीर (Pune) केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी केल्यास आपले राष्ट्र विकसनशीलते कडून विकसित राष्ट्र बनेल. या धोरणाची अंमलबजावणी प्रभावी न झाल्यास देशातील तरुणांमध्ये केवळ आणि केवळ गोंधळ उडेल. अशी भीती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ यांनी व्यक्त केली.

निगडी प्राधिकरणातील कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. अरविंद ब तेलंग वरिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने नवीन शैक्षणिक धोरण राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कॅंप एज्युकेशन सोसायटीचे संचालक डॉ. इम्तियाज मुल्ला, तेलंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पाटील, समन्वयक डॉ. दत्तात्रय खुणे, डॉ. अनिल नागणे आदी उपस्थित होते.

डॉ. अडसूळ पुढे म्हणाले कि, शिक्षण हि तत्वज्ञानाची गतिशील तर मानसशास्त्राची कृतिशील बाजू आहे. सुज्ञ नागरीक घडविणे हा शिक्षणाचा हेतूने आहे. शिक्षकांनी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या जीवनाला अर्थ प्राप्त होईल या हेतूने त्यांना जीवन कौशल्याचे शिक्षण दिले पाहिजेत. नवीन शैक्षणिक धोरणांचे केंद्र सरकारने एकदातरी पडताळणी करून पहायला हवी होती. धोरण हे आवाक्यातील असावे. विकासाला पूरक व लवचिक असावे.असे मत डॉ अडसूळ यांनी शेवटी व्यक्त केले.

प्राचार्य डॉ पाटील यांनी सांगितले कि, नवीन शैक्षणिक (Pune) धोरण हे विकासाची नांदी ठरणार असून यामुळे उद्याचा सक्षम भारत घडणार आहे, असा विश्वास व्यक्त केला. मॉडर्न विद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय खरात यांनी आंतरविद्याशाखीय शिक्षण पद्धती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वाणिज्य विभागाचे सहयोगी अधिष्ठाता यशोधन मिठारे यांनी इंटर्नशिपद्वारे प्रशिक्षणाची संधी, एस. जी. एन. व्यवस्थापन संशोधन संस्थेचे संचालक डॉ. किशोर जगताप यांनी “नवीन रोजगार निर्मितीत उद्योग संस्थांची भुमिका” या विषयावर मार्गदर्शन केले. राज्यभरातील अनेक अभ्यासक सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दत्तात्रय खुणे यांनी केले. तुषार भोसले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन ज्योती वाणी, तर आभार डॉ. मीनाक्षी राऊत यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.