Akurdi : काळेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते प्रीतम शहा यांना मानव रत्न पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज – मानव संसाधन विकास सेवा संस्थेच्या वतीने काळेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रीतम शहा यांना मानव रत्न पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.

मानव संसाधन विकास सेवा संस्थेच्या वतीने आकुर्डी येथे मानव अधिकार दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष बागूल यांच्या हस्ते प्रीतम शहा यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रीतम शहा हे सामाजिक कार्यकर्ते असून बऱ्याच सामाजिक संस्थेचे काम करतात.

प्रमुख पाहुणे म्हणून नवी दिल्ली येथील क्षत्रिय सीरवी संघटनेचे उपाध्यक्ष राकेश चौधरी उपस्थित होते. मानव सेवा भूषण पुरस्कार देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास मानव संसाधन विकास सेवा संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हाळसकर, उपाध्यक्ष संतोष बागूल, सरचिटणीस सुनील उबाळे, राज्य सचिव नरेश आनंद, महिला अध्यक्ष नलिनीताई शिंदे, जनसंपर्क अधिकारी कालूगिरी गोस्वामी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.