Pune : विदेशवारी करणाऱ्या नागरिकांचा सोसायटीधारकांनी घेतलाय धसका!

तपासणी करण्यासाठी नगरसेवकांना फोन

एमपीसी न्यूज – विदेशवारी करणाऱ्या अनेक नागरिकांचा मोठमोठ्या सोसायटीतील नागरिकांनी धसका घेतला आहे. या लोकांची तातडीने तपासणी करण्यासाठी आमच्याकडे विचारणा होत असल्याची माहिती काही नगरसेवकांनी दिली.

जानेवारी महिन्यापासून ‘कोरोना’चे संकट गंभीर आहे. तरीही या नागरिकांनी विदेशवारी केल्याबाबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यात ‘कोरोना’ हा स्थानिक नव्हे तर विदेशातून आलेल्या लोकांमुळेच वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

महापालिकेतर्फे सध्या ‘कोरोना’चा संशयित रुग्णांसाठी विलगिकरणाचे कक्ष सुरू करण्यात आला आहे. तर, सध्या उपनगरांत 20 ते 25 मिनिटांतच पोहोचण्यासाठी कालावधी लागत असल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. एरव्ही हाच प्रवास करण्यासाठी तास ते दीड तास लागतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.