Pune : ‘सौर ऊर्जा आणि इन्व्हर्टर मधील नवे तंत्रज्ञान’ विषयावरील चर्चासत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज- इनो सोलर एनर्जी प्रा.लि. आणि महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आयोजित ‘सौर ऊर्जा आणि इन्व्हर्टर मधील नवे तंत्रज्ञान’ या विषयावरील चर्चासत्राला चांगला प्रतिसाद मिळाला. मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजच्या सुमंत मुळगावकर सभागृहात हे चर्चासत्र झाले.

स्टिफन थिएरफेल्डर ( मुख्य कार्यकारी अधिकारी,रेफूसोल, जर्मनी ),हरप्रीत सिंग धीर ( रेफूसोल, साऊथ एशिया बिझनेस हेड ), महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन चे अध्यक्ष संजय कुलकर्णी, उपाध्यक्ष प्रदीप कुलकर्णी, उन्मेश जगताप (मुख्य कार्यकारी अधिकारी, इनो सोलर एनर्जी प्रा.लि. ) उपस्थित होते. अश्वीनी जगताप यांनी स्वागत केले .

इनो सोलर एनर्जी प्रा.लि. प्रामुख्याने ऐनर्जी सेव्हिंग आणि सोलर एनर्जीमध्ये कार्यरत आहे व रेफुसोल, जर्मनी बरोबर त्यांनी सेल्स आणि सर्व्हीसचा करार केला आहे. कंपनी पुण्यामध्ये अद्ययावत सर्व्हीस व टेस्ट सेंटर आस्थापीत करणार आहे, अशी माहिती उन्मेश जगताप, (मुख्य कार्यकारी अधिकारी, इनो सोलर एनर्जी प्रा.लि. ) यांनी दिली.

स्टिफन थिएरफेल्डर यांनी ‘ रेफूसोल ‘ अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानाने तयार झालेल्या इन्व्हर्टरची माहिती दिली. ते म्हणाले, “भारताला सौरऊर्जेचे वरदान असून गुणवत्तापूर्ण जर्मन इन्व्हर्टर वापरले तर या सौरऊर्जेचा परिणामकारक वापर भारतीयांचे जीवन बदलून टाकेल”

हरप्रीत सिंग धीर म्हणाले, “सौरऊर्जेच्या दूरगामी वापरासाठी गुणवत्तेची हमी देणारी उत्पादने वापरणे हितकारक असते . त्यात तडजोड केली की नंतर ग्राहकालाच त्रास होतो”

संजय कुलकर्णी म्हणाले, “सौरऊर्जेचे महत्व महाराष्ट्राला पटले असून आगामी काळात महाराष्ट्र हा सर्वात जास्त सौर ऊर्जा निर्माण करणारा प्रदेश बनणार आहे . सौर ऊर्जेचे महत्व आणि किफायतशीरपणा ग्राहकापर्यंत पोहोचविण्यासाठी जागृती निर्माण केली पाहिजे”

या चर्चसत्राला सौर ऊर्जा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.