BNR-HDR-TOP-Mobile

Pune : टाटा मोटर्स शहरी वाहतूक व्यवस्थेसाठी प्रदर्शित करणार एकात्मिक कचरा व्यवस्थापन उपाययोजना

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – स्वच्छ भारत मिशनबद्दल असलेल्या बांधिलकीचा पुनरुच्चार करत, टाटा मोटर्स 19 ते 21 सप्टेंबर, 2018 दरम्यान बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये होत असलेल्या म्युन्सिपालिका 2018 सोहळ्यात आपल्या एकात्मिक कचरा व्यवस्थापन उपाययोजनांचे प्रात्यक्षिक दाखवणार आहे. यावेळी प्रदर्शनासाठी ठेवलेली उत्पादने उपयोजनांच्या एका विस्तृत श्रेणीचे प्रात्यक्षिक देतील. यात घन व द्रव कचरा व्यवस्थापन, वॉटर टँकर्स आणि रोड स्वीपर्स यांचा समावेश आहे. सध्या महानगरे व छोट्या शहरांमध्ये भेडसावणारी योग्य पद्धतीने कचरा व्यवस्थापनाची गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक अशी उत्पादने यावेळी दाखवली जाणार आहेत.

ट्विन बिन साइड टिपर ऑन एस एचटी, बॉक्स टिपर ऑन फेसलिफ्ट बीएसफोर टिपर, हॉपर टिपर_बिन लिफ्टर ऑन मेगा आणि एलपीटी 1613 जेटिंग कम सक्शन मेसर्स या उत्पादनांचे प्रदर्शन म्युन्सिपालिका 2018 या सोहळ्यात केले जाईल. अतिप्रगत तंत्रज्ञानाने युक्त, वापरण्यासाठी सोपी व सोयीस्कर, कार्यक्षम व भरवशाची कामगिरी आणि अत्यंत वाजवी खर्च ही या उपाययोजनांची वैशिष्ट्ये आहेत. या प्रकारांमध्ये श्रेष्ठ रचना, उत्तम इंधन कार्यक्षमता, दीर्घ सेवा कालावधी तसेच बहुविध उपयोजनांसाठी विविध प्रकारे कस्टमायझेशन आदी सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे नगरपालिकांना वाहतुकीची अधिक चांगली साधने पुरवली जाऊ शकतील.

यावेळी टाटा मोटर्स लिमिटेडच्या व्यावसायिक वाहन व्यवसाय विभागाचे उपाध्यक्ष- विक्री व मार्केटिंग- आर. टी. वासन म्हणाले, “भारतात शहरी भागातील कचरा ही मोठी समस्या असून यामुळे आरोग्य तसेच पर्यावरणाच्या समस्याही निर्माण होत आहेत. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार, 2025 सालापर्यंत भारतातील दैनंदिन कचरानिर्मिती 377,000 टनांचा टप्पा गाठणार आहे. ही समस्या सोडवण्यासाठी खासगी व सरकारी क्षेत्राने एकत्र येऊन काम केले पाहिजे व हरित तसेच स्वच्छ भारताचे स्वप्न साकार केले पाहिजे. आम्ही, टाटा मोटर्स, सरकारसोबत सहयोग करत आहोत आणि आजच्या स्मार्ट शहरांना स्मार्ट वाहतूक पर्याय पुरवण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. म्युन्सिपालिका 2018 मधील आमचे प्रदर्शन म्हणजे स्वच्छ भारत मिशनच्या उद्दिष्टांप्रती तसेच देशातील आरोग्य व पर्यावरणाच्या अधिकाधिक गंभीर होत चाललेल्या समस्या सोडवण्याप्रती आम्ही मानत असलेल्या बांधिलकीचा पुनरुच्चार आहे.

या क्षेत्रात काम करणारी आद्य कंपनी म्हणून आम्ही देशातील विविध नगरपालिकांना स्वच्छ भारत मिशनखाली कचरा व्यवस्थापनाच्या उपाययोजना पुरवत आहोत. देश एका अधिक स्वच्छ व अधिक हरित भविष्यकाळासाठी ज्या रूपांतरणाच्या टप्प्यातून जात आहे त्याचा भाग होण्याचे व्यासपीठ म्युन्सिपालिकाच्या निमित्ताने आम्हाला मिळाले आहे,” असेही ते म्हणाले.

उत्पादनांबाबत महत्वाच्या बाबी –

# देशातील अनेक नगरपालिकांचा सर्वाधिक विश्वासू सहयोगी म्हणून मान्यता – टाटा मोटर्स स्वच्छ भारत मिशनखाली अनेक नगरपालिकांना कचरा व्यवस्थापन उपाययोजना पुरवण्यात आघाडीवर राहिली आहे.

# ‘शून्य उत्सर्जन’ वाहतुकीच्या साधनांवर काम करतानाच कंपनीला स्मार्ट सिटीजच्या यादीतील सहा शहरांकडून भारत सरकारच्या एफएएमई योजनेखाली इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा करण्यासाठी ऑर्डर्स प्राप्त झाल्या आहेत.

# 8 घनमीटर ट्विन बिन साइड टिपर_एस एचटी – हे एक टार्पोलिनचे आच्छादन असलेले साइड टिपिंग हॉपर टिपर असून, यात 0.9 सीयूएमच्या दोन स्वतंत्र (एकूण 1.8 सीयूएम) कचराकुंड्या, ओल्या व सुक्या कचऱ्यासाठी आहेत. या कुंड्यांतील कचरा वाहनाच्या उजव्या बाजूला असलेल्या स्थिर कॉम्पॅक्टरद्वारे बाहेर टाकला जाऊ शकतो. त्यानंर कॉम्पॅक्टर निश्चित जागेतील कचरा बाहेर टाकू शकतो.

# घनमीटर बॉक्स टिपर ऑन फेसलिफ्ट बीएसफोर – हा आच्छादित बॉक्स टिपर असून यामध्ये सुक्या व ओल्या कचऱ्यासाठी दोन भाग आहेत. त्यांचे प्रमाण सुक्या कचऱ्यासाठी 70 टक्के जागा, तर ओल्या कचऱ्यासाठी 30 टक्के जागा असे आहे. ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण स्रोताजवळच केले तर नगरपालिकेसाठी कचऱ्याची विल्हेवाट लावणे सोपे होते.
2.2 घनमीटर हॉपर टिपर_बिन लिफ्टर मेगा- एस मेगा प्लॅटफॉर्मवर बिन कार्टच्या व्यवस्थेसह हा हॉपर टिपर आहे. कचरा बिन कार्टमधून गोळा केला जाऊ शकतो आणि तो हायड्रोलिक यंत्रणेच्या मदतीने हॉपर बकेटमध्ये टाकला जाऊ शकतो.

# जेटिंग कम सक्शन M/c (8 केएल) – यामध्ये एक ट्रकवर लादलेले (एलपीटी1613) मोबाइल युनिट असून सांडपाण्याच्या मार्गांतील अडथळे, कोंडी काढून टाकण्यासाठी हे उपयुक्त आहे. उच्च दाबाची वॉटर जेटिंग प्रणाली वापरून तसेच शोषून घेण्याच्या पद्धतीने (व्हॅक्युम सक्शन प्रणालीच्या माध्यमातून सक्शनिंग) सांडपाण्याची मॅनहोल्स, गली पिट्स, सेप्टिक टँक आदींतून गाळ/कचरा ओढून काढला जातो. जमलेला गाळ कंटेनरचे हायड्रोलिक टिपिंग करून किंवा ब्लोबॅक पद्धतीने बाहेर टाकला जातो. या टँकची क्षमता सुमारे 8000 किलोग्रॅम (पाणी साठवण्याची क्षमता 5000 किलो, तर गाळ साठवण्याची क्षमता 3000 किलो) आहे.

# भारताचा शहरीकरणाबद्दलचा दृष्टिकोन सध्या मोठ्या बदलातून जात आहे. वाढत्या आधुनिक शहरांच्या गरजांमुळे निर्माण झालेली वाहतूक क्षेत्रातील आव्हाने लक्षात घेऊन नगररचनेवर मोठा भर दिला जात आहे. टाटा मोटर्सची वाहने देशभरात शहरी वाहतुकीची साधने पुरवण्यात आघाडीवर राहिली आहेत आणि भविष्यातही स्मार्ट सिटीजसाठी स्मार्ट वाहने विकसित करण्यावर भर देणे आम्ही सुरूच ठेवू. पहिल्या टप्प्यात शून्य उत्सर्जन बसेस वापरात आणण्यासाठी निश्चित केलेल्या 9 शहरांपैकी 6 शहरांनी 255 इलेक्ट्रिक बसगाड्या तयार करण्याचे काम आमच्यावर सोपवले आहे.

# म्युन्सिपालिका 2018 हे सरकारे, स्थानिक यंत्रणा आणि खासगी संस्थांसाठी परस्पर सहकार्याने अधिक चांगल्या शहरांच्या उभारणीकरता सक्षम वातावरण निर्माण करण्याची संधी देणारे मेगा-नेटवर्किंग व्यासपीठ ठरणार आहे.

HB_POST_END_FTR-A4

.