Pune : संततधारमुळे मुंबई-पुणे मार्गावरील काही रेल्वे गाड्या रद्द

एमपीसी न्यूज – पुणे, मुंबई शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. दरम्यान, काही ठिकाणी दरड कोसळली असल्याने पुणे-मुंबई मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. तसेच अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यातील बऱ्याच रेल्वे गाड्या ह्या गुरुवारपासून (दि.8) पासून ते रविवारपर्यंत (दि. 11) रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.

सेवा विस्कळीत झालेल्या रेल्वेगाड्या – मुंबई-पुणे मागार्वरील रद्द रेल्वे गाड्या :

# पुणे – मुंबई 11010/11009) सिंहगड एक्सप्रेस गुरुवारपासून (दि.8) पासून रविवारपर्यंत (दि. 11) रद्द करण्यात आली आहे.
# पुणे – मुंबई (12124/12123) डेक्कन क्वीन एक्सप्रेस गुरुवारपासून (दि.8) पासून  रविवारपर्यंत (दि. 11) रद्द करण्यात आली आहे
# पुणे – मुंबई (12127/12128) इंटरसिटी एक्सप्रेस गुरुवारपासून (दि.8) पासून  रविवारपर्यंत (दि. 11) रद्द करण्यात आली आहे.
# पुणे – मुंबई (22106 /22105) इंद्रायणी एक्सप्रेस गुरुवारपासून (दि.8) पासून  रविवारपर्यंत (दि. 11) रद्द करण्यात आली आहे.

याचबरोबर, कोल्हापूर-मुंबई मागार्वरील रद्द रेल्वे गाड्या :

# कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर (11023/11024) सह्याद्री एक्सप्रेस गुरुवारपासून (दि.8) पासून  रविवारपर्यंत (दि. 11) रद्द करण्यात आली आहे.
# कोल्हापूर-मुंबई मार्गावरील (17412) महालक्ष्मी एक्सप्रेस गुरुवारपासून (दि.8) पासून  रविवारपर्यंत (दि. 11) रद्द करण्यात आली आहे.
# मुंबई-कोल्हापूर मार्गावरील (17411) महालक्ष्मी एक्सप्रेस गुरुवारपासून (दि.8) पासून  रविवारपर्यंत (दि. 12) रद्द करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.