Pune : साउंड अँड इलेक्ट्रिकल जनरेटर्स असोसिएशनतर्फे सांगली येथील पूरग्रस्त 131 विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप

एमपीसी न्यूज – सांगली येथे आलेल्या पुरामुळे परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुण्यातील साऊंड इलेक्ट्रिकल जनरेटर असोसिएशन तर्फे तेथील बांधवांना मदत करण्यात आली. सांगली येथील 131 विद्यार्थिनींना सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

सांगली स्थित राणी सरस्वती देवी कन्या शाळा येथील 131 विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले गेले. या शैक्षणिक साहित्यामध्ये स्कूल बॅग, कंपास बॉक्स तसेच इयत्ता नववीच्या पुस्तकांचा सेट देण्यात आला. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष बबलू रमजानी, उपाध्यक्ष शैलेश गायकवाड, मेहबूब खान, राजू कांबळे, संजय टोळगे, अजीज शेख, सोमनाथ धेंडे, सुनील ओव्हाळ, उदय इनामके, अभिजीत राठोड आणि बंडु वाळवेकर उपस्थित होते.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता माने तसेच शाळेच्या ट्रस्टच्या कार्यवाह उषा कुलकर्णी व अन्य शिक्षक-शिक्षिका उपस्थित होत्या.

यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष बबलू रमजानी यांनी सांगितले की, सामाजिक बांधिलकी म्हणून हे कार्य करण्यात आले. नेहमीच संकटाच्या काळी असोसिएशन तर्फे काही ना काही मदत करण्यात येते. सांगली-कोल्हापूर पूरग्रस्तांना आतापर्यंत अन्न-धान्य स्वरूपात मोठ्या प्रमाणात मदत मिळालेल्या आहेत. म्हणून असोसिएशन तर्फे देशाचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याची मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सांगली येथे जाऊन विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली. असोसिएशन देखील समाजाचा एक घटक असल्याने नेहमीच कुठल्या ना कुठल्या प्रकारचे सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न असतो.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like