Pune : कोरोना टेस्टसाठी विशेष बसची सोय ; उदघाटनावेळी चाकाखाली लिंबू ठेवल्याने आश्चर्य

एमपीसी न्यूज – पुण्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीरच होत चालले आहे. ते कमी करण्यासाठी कंटेनमेंट झोनमधील नागरिकांची वैद्यकीय तपासणीसाठी विशेष बसची सुविधा करण्यात आली आहे. बुधवारी बसच्या उद्घटनावेळी बसच्या चाकाच्या खाली लिंबू ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

कोरोना संशयित रुग्णाची चाचणी करणाऱ्या अत्याधुनिक उपकरणासाहित वातानुकुलीत फिरत्या बसचे उदघाटन आज महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे महापालिका मुख्य इमारत येथे हा लोकार्पण सोहळा पार पडला.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, डॉ. अंजली साबणे, डॉ. राजेंद्र जोशी, अनिल साळुंखे उपस्थित होते.

या बसमध्ये कोरोना संशयित रुग्णांचे स्वाब संकलन, मोबाईल एक्स रे, रक्त चाचणी, रक्तदाब, प्राणवायूचे प्रमाण व तापमान या चाचण्या करण्याची सुविधा आहे. पुण्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे महापालिका आणि क्रिस्ना डायगनस्टिक्स प्रा. ली. यांच्यावतीने कोरोना चाचणीची अत्याधुनिक तांत्रिक बस तयार करण्यात आली आहे.

ही बस वस्ती पातळीवर कार्यरत राहणार असल्याची माहिती क्रिस्ना डायगनस्टिक्सच्या व्यवस्थापकीय संचालिका पल्लवी जैन यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.