Pune : कोरोनाला रोखण्यासाठी झोपड्पट्टीभागात विशेष लक्ष द्यावे. : डॉ. सिद्धार्थ धेंडे

Pune: Special care should be taken in the slums to prevent corona. : Dr. Siddharth Dhende

एमपीसी न्यूज – सार्वजनिक शौचालयाचा वापर आणि झोपडपट्ट्या भागांत दाटीवाटीने राहणाऱ्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना वाढण्याची भीती असल्याचे आपण 15 दिवसांपूर्वीच सांगितले होते. वेळीच खबरदारी घेतली असती तर कोरोनाचा संसर्ग रोखता आला असता. त्यामुळे आता तरी शहरातील  दाटलोकवस्ती असलेल्या झोपडपट्टी भागात विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन माजी उपमहापौर आणि नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केले आहे.

या बाबत अधिक माहिती देताना डॉ. धेंडे म्हणाले, शहरातील झोपडपट्ट्यात एका – एका शौचालयाचा 200 नागरिक वापर करतात. या शौचालया शेजारी हातधुण्याची व्यवस्था करावी. सॅनिटायझेनची नवीन मशीन महापालिकेने तात्काळ खरेदी करून तिथे बसविल्यास बऱ्यापैकी कोरोनाचा प्रसार थांबविता येऊ शकतो, हे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते.

त्यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, सहकार आयुक्त सौरभ राव व इतर महापालिकेचे अधिकारी यांनी उपस्थित होते. प्रशासनाने याची तातडीने दाखल घेऊन उपाययोजना केल्या असत्या तर कोरोनाचे हे संकट काही प्रमाणात टाळता आले असते, असे डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी  सांगितले.

पुणे महापालिकेच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असलेल्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात टेस्टिंग केल्या जाव्यात. ही सुविधा महापालिकेच्या वॉर्ड स्तरीय  रुग्णालयात करण्यात यावी. त्यामुळे नागरिकांना घराजवळ ही सुविधा उपलब्ध होईल.

नागरिकांना होमकोरोंटाईन ठेवून त्यातील जे पॉझिटिव्ह रुग्ण येतात त्यांनाच फक्त ऍडमिट करून ट्रीटमेंट दिली तरी महापालिकेवरील ताण कमी होणार असल्याचे डॉ. धेंडे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.