Pimpri : दिवाळीनिमित्त वल्लभनगर आगारातून जादा एसटी बस सुरु

एमपीसी न्यूज- दिवाळीनिमित्त राज्य परिवहन महामंडळाच्या पिंपरी वल्लभनगर आगारामधून महाराष्ट्राच्या विविध भागात जाण्यासाठी जादा एसटी बस सोडण्यात आल्या आहेत. त्यासाठी आरक्षणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. अशी माहिती आगार प्रशासनाने दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या संख्येने उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी राज्यभरातून आले आहेत. दिवाळीसाठी या विद्यार्थ्यांना गावी जाता यावे, यासाठी वल्लभनगर आगारातून राज्यातील सोलापूर, कोल्हापूर, अकोला, लातूर, सांगली, चिपळूण व दापोली आदी 9 ठिकाणांसाठी जादा बस सुरु करण्यात आल्या आहेत. 35 ते 40 प्रवाशांचा एक ग्रुप एकाच ठिकाणी प्रवास करण्यासाठी आला तर, त्यांना बस उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे आगार प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.