Pune : ‘काश्मीर :काल ,आज ,उद्या’ या विषयावर संजय सोनवणी यांचे आज व्याख्यान

डॉ कुमार सप्तर्षी यांच्या 78 व्या वाढदिवसा निमित्ताने आयोजन

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ,युवक क्रांती दल महाराष्ट्रच्या वतीने ‘काश्मीर :काल ,आज ,उद्या’ या विषयावर लेखक संजय सोनवणी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

आज, बुधवारी (दि. 21) संध्याकाळी साडेपाच वाजता, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी येथे हे व्याख्यान होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र गांधी स्मारक निधी सचिव अन्वर राजन यांनी ही माहिती दिली. डॉ कुमार सप्तर्षी यांच्या 78 व्या वाढदिवसा निमित्ताने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.