Pune : भरधाव वेगातील ट्रकची दुचाकीला धडक; तरुणीचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज-भरधाव येणाऱ्या ट्रकच्या धडकेत 23 वर्षीय तरुणीचा जागीच ( Pune ) मृत्यू झाला.पुण्यातील वडगाव पुलाजवळ मंगळवारी रात्री हा भीषण अपघात झाला . ऋतुजा वायकर असे मृत्युमुखी पावलेल्या तरुणीचे नाव आहे .

Maharashtra News : महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीत पुन्हा नंबर एकवर-देवेंद्र फडणवीस

ऋतुजा ही बावधन वरुन नऱ्हे आंबेगवच्या दिशेने रात्री 9.30  च्या सुमारास तिच्या दुचाकीवरून चालली होती. मुंबई बेंगळुरू महामार्गावरून वडगाव पुलाजवळ ती आली असताना तिला भरधाव ट्रक ने पाठीमागून धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की चालत्या ट्रकचे  चाक तिच्या डोक्यावरून गेले आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

अपघात होताच ट्रकचालक तिथून फरार झाला . अधिक तपास वारजे पोलिस करीत ( Pune ) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.