Pune : क्रीडा, विधी, शहर सुधारणा, महिला-बालकल्याण समितीच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड लांबणीवर

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. त्यामुळे क्रीडा, विधी, शहर सुधारणा, महिला- बालकल्याण समितीच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड लांबणीवर पडणार आहेत. त्यामुळे या नगरसेवकांच्या स्वप्नावर सध्या तरी पाणी फिरले आहे.

भाजपचे अनेक नगरसेवक नाराज आहेत. त्यातील अनेकांची समजूत घालून पुणे महापालिकेच्या क्रीडा, विधी, शहर सुधारणा आणि महिला व बालकल्याण समितीवर या नगरसेवकांची निवड करण्यात आली. यातील अनेकांनी आता आपणच अध्यक्ष होणार असल्याचा प्रचार सुरू केला आहे. पण,क्रीडा, विधी, शहर सुधारणा, महिला- बालकल्याण समितीच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड लांबणीवर पडणार आहेत. त्यामुळे या नगरसेवकांच्या स्वप्नावर सध्या तरी पाणी फिरले आहे.

या चारही समित्यांवर भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँगेसच्या 52 नगरसेवकांची वर्णी लागली आहे. भाजपचे नगरसेवक या समित्यांत जास्त असल्याने त्याच पक्षाचे अध्यक्ष – उपाध्यक्ष निश्चित मानले जात आहे. नगरसचिव कार्यालयातर्फे या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर या नगरसेवकांना सत्तेचा लाभ मिळणार आहे.

या समितीच्या अध्यक्ष – उपाध्यक्षांना महापालिकेची गाडी, कार्यालय असल्याने नगरसेवकांनी आपली या पदावर वर्णी लागावी, यासाठी जोरदार ‘लॉबिंग’ सुरू केले आहे, असे समजते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.