Pune : शहरात प्रभाग 18 मध्ये औषध फवारणी; काळजी घेण्याचे नागरिकांना आवाहन

एमपीसी न्यूज – पुणे शहरात, राज्यात, देशात व संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या ‘कोरोना’पासून बचावासाठी प्रभाग 18 मध्ये औषध फवारणी करण्यात आली.

माझ्या प्रभागात योग्य ती सर्व खबरदारी आम्ही घेत आहोत. याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्र.१८ मध्ये गंज पेठ, मासे आळी, श्रमदान मंडळ, विजयवल्लभ शाळा, घसेटी पूल, आंगरशा तकीया, भवानी पेठ, रविवार पेठ, बंदीवान मारूती, काची आळी, शुक्रवार पेठ, शाहू चौक, गुरूवार पेठ या सर्व ठिकाणी औषध फवारणी आपण स्वतः केली, असे नगरसेविका आरती सचिन कोंढरे यांनी सांगितले आहे.

सर्वत्र स्वच्छता ठेवण्याचे व आरोग्याची काळजी घेण्याचे नागरिकांना आवाहनही त्यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.