Pune : बंधुता साहित्य परिषद व ‘काषाय’तर्फे डॉ. श्रीपाल सबनीस यांचा जाहीर सत्कार

एमपीसी न्यूज- राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व काषाय प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने विसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष व ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन केले आहे. गुरुवारी (दि. 20) सकाळी साडेदहा वाजता टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते उल्हास पवार, भोसरी येथील भगवान महावीर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया, संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रकाश जवळकर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे असतील.

डॉ. सबनीस यांच्या सत्कार सोहळ्याबरोबरच प्रबोधनयात्री कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये मुंबईचे दीप पारधे, संदीप कांबळे, दौंडचे बबन धुमाळ, ठाण्याचे विजय जाधव, अमरावतीचे गुलाब फुलमाळी, पुण्याचे डॉ. भीम गायकवाड, संतोष हुले, पिंपरीचे शंकर आथरे व सांगवीच्या मधुश्री ओव्हाळ या कवींचा सहभाग असणार आहे, अशी माहिती काषाय प्रकाशनचे संचालक व कवी चंद्रकांत वानखेडे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.