Pune : सृजन करंडक 2019 सिक्स ‘अ’ साईड स्लम फुटबॉल स्पर्धेत श्री स्व. अनंतराव पवार स्कूल, मातोश्री गर्ल्स स्कूल अंतिम फेरीत

एमपीसी न्यूज – स्व. अनंतराव पवास स्मृती इंग्लिश माध्यम स्कूल आणि मातोश्री इंग्लिश माध्यम स्कूल संघांनी सिक्स ‘अ’ साईड स्लम फुटबॉल स्पर्धेत मुलींच्या 16 वर्षांखालील गटातून अंतिम फेरी गाठली.

औंध येथील चोंडे पाटिल स्पोर्टस झोन येथे झालेल्या उपांत्य फेरीच्या दुहेरी फेस ऑफ प्रकारात झालेल्या लढतीत स्व. अनंतरावर पवार स्कूलने दोन्ही सामन्यात पूज्य कस्तुरबा गांधी इंग्लिश माध्यम स्कूलचा पराभव केला. तर मातोश्री इंग्लिश माध्यम स्कूलला आयडियल इंग्लिश माध्यम स्कूलकडून पहिल्या सामन्यात लपराभव पत्करावा लागला. मात्र, दुसरा सामना जिंकून त्यांनी बाजी मारली.

पहिल्या उपांत्य लढतीत स्व. अनंतराव स्कूलने पूज्य कस्तुरबा गांधी स्कूलचा 3-0 असा पराभव केला. रिया भंडारे, यू. खुडावत आणि झोया शेख यांनी अनुक्रमे तिसऱ्या, सहाव्या आणि बाराव्या मिनिटाला गोल केला. परतीच्या सामन्यातही पवार स्कूलने बाजी मारताना 1-0 असा विजय मिळविला. हा एकमात्र गोल रिया भंडारे हिने केला.

दुसऱ्या उपांत्य सामन्यात मातोश्री इंग्लिश माध्यम स्कूल संघाला आयडियल इंग्लिश स्कूल विरुद्ध 1-2 असा पराभव पत्करावा लागला. समृद्धि लवाटे हिने सहाव्या मिनिटाला गोल करन मातोश्री स्कूलला आघाडीवर नेले. मात्र, नंतर तीनच मिनिटांनी हुमेरा शेख हिने आयडियल स्कूलला बरोबरी साधून दिली. पुढे 13व्या मिनिटाला मुस्कान शेख हिने गोल करून, आयडियलला विजयी केले.

परतीच्या लढतीत मात्र मातोश्री स्कूल संघाने आयडियल संघाच्या खेळाडूंना वर्चस्व राखण्याची संधीच दिली नाही. त्यांनी 2-0 असा विजय मिळवून अंतिम फेरी निश्चित केली. काजल चव्हाण हिने तिसऱ्या, तर आनंदी लोखंडे हिने दहाव्या मिनिटाला गोल केला. यामुळे मातोश्री संघाने 3-2 अशा एक गोल सरासरीने अंतिम फेरी गाठली.

निकाल : उपांत्य फेरी –
मुली 16 वर्षांखालील – आयडियल इंग्लिश माध्यम स्कूल 2 (हुमेरा शेख 9वे, मुस्कान शेख 13वे मिनिट) वि.वि. मातोश्री इंग्लिश माध्यम स्कूल 1 (समृद्धि लवाटे ६वे मिनिट).
स्व. अनंतराव पवार स्मृती इंग्लिश माध्यम स्कूल 3 (रिया भंडारे 3, यु. खुडावट 6, झोया शेख 12वे मिनिट) वि.वि. पूज्य कस्तुरबा गांधी इंग्लिश माध्यम स्कूल 0.

मातोश्री इंग्लिश माध्यम स्कूल 2 (काजल चव्हाण 3 आनंदी लोखंडे 10वे मिनिट) वि.वि. आयडियल इंग्लिश स्कूल 0.
स्व. अनंतराव पवार इंग्लिश माध्यम प्रशाला 1 (रिया भंडारे 8वे मिनट) वि.वि. पूज्य कस्तुरबा गांधी इंग्लिश माध्यम स्कूल 0.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.