pune : ‘सॅनिटरी नॅपकिन्स’ प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीचा प्रस्ताव मंजूर

एमपीसी न्यूज : महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील विविध बारा ठिकाणी चालविण्यात येणाऱ्या सॅनिटरी नॅपकिन्स डिस्पोजल प्रकल्पांच्या वर्षभराच्या देखभाल दुरुस्तीसाठीच्या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिली. स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

फुलेनगर, नगर रस्ता, कोथरुड, संगमवाडी, औंध, घोले रस्ता, ढोले पाटील रस्ता, कोरेगाव पार्क, पेशवे पार्क, वर्तक उद्यान, गरवारे महाविद्यालय, भक्तिसागर स्मशानभूमी ,वडगाव शेरी या 12 ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन्सची विल्हेवाट लावणारे प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची देखभालीचा करार संपला होता. करार वाढवून प्रकल्प पुढे चालवण्याची मागणी केली जात होती, त्यामुळे या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आल्याचे मुळीक यांनी सांगितले. त्यानुसार श्री गणेश एंटरप्रायझेसच्या सुमारे 73 लाख 16 हजार रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.