Pune : स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने बुधवारी सादर करणार अंदाजपत्रक

एमपीसी न्यूज – महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सादर केलेल्या पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकात सुधारणा करून स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने हे 2020 – 21 चे अंदाजपत्रक बुधवारी (दि. 26) सकाळी सादर करणार आहेत. या अंदाजपत्रकामधून पुणेकरांना खूप अपेक्षा आहेत.

साधारण 7 हजार कोटींच्या आसपास हे बजेट जाणार आहे. 2017 च्या महापालिका निवडणुकीत पुणेकरांनी भाजपला एकहाती सत्ता देत तब्बल 98 नगरसेवक निवडून दिले होते. त्यावेळी स्थायी समिती अध्यक्षपदाची जबाबदारी आताचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना दिली होती.

मोहोळ यांनी मांडलेल्या अंदाजपत्रकात महापालिकेचे स्वतःचे वैद्यकीय महाविद्यालय, चांदणी चौक उड्डाणपूल, एचसीएमटीआर, जायका, शिवसृष्टी, पंतप्रधान आवास योजना, गावांचा समावेश, शहराच्या विविध भागांत उड्डाणपूल, बालगंधर्व पुनर्विकास, 24 बाय 7 समान पाणीपुरवठा योजना, शिवसृष्टी, आशा अनेक योजनांचे स्वप्न दाखविण्यात आले होते. यातील सर्वच प्रकल्प कागदावर आहेत. या प्रकल्पांसाठी हेमंत रासने काय तरतूद करणार, याची उत्सुकता लागली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.