BNR-HDR-TOP-Mobile

Pune : स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेता, ‘पीएमपीएमएल’ संचालक पदासाठी कोणाचे नशीब उजळणार?; मंगळवारी भाजपच्या बैठकीत होणार निर्णय

0

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेता आणि ‘पीएमपीएमएल’ संचालक पदावर कोणत्या नगरसेवकांची वर्णी लागणार, त्याचा निर्णय मंगळवारी आयोजित भाजपच्या बैठकीत ठरणार आहे. सभागृह नेता आणि स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी काकडे आणि बापट गट आमनेसामने आले आहेत. पक्ष कोणाला संधी देणार, याची उत्सुकता लागली आहे.

सभागृह नेता पदासाठी धिरज घाटे, महेश लडकत यांच्यात जोरदार चुरस निर्माण झाली आहे. ऐनवेळी नगरसेवक हेमंत रासणे, राजेश एनपुरे, सुशील मेंगडे, दीपक पोटे, नगरसेविका मंजुषा नागपुरे, आरती कोंढरे यांचाही विचार होऊ शकतो.

स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी हेमंत रासणे, दीपक पोटे, राजेंद्र शिळीमकर यांच्या नावाची चर्चा आहे. तर, ऐनवेळी नगरसेवक शंकर पवार यांची दमदार एन्ट्री होऊन त्यांनाही अध्यक्षपद दिले जाऊ शकते. ‘पीएमपीएमएल’ संचालक पदासाठी नगरसेवक प्रवीण चोरबेले, अनिल टिंगरे इच्छुक आहेत. वरील 3 पदांपैकी 1 पद महिला नागरसेविकांना देण्याची जोरदार मागणी होत आहे.

सिद्धार्थ शिरोळे आणि सुनील कांबळे आमदार झाल्याने दोघांनाही त्यांच्याकडे असलेल्या अतिरिक्त पदाचा राजीनामा देण्यास पक्षाने तातडीने सांगितले. नवीन नगरसेवकांना या पदावर आता काम करण्याची संधी द्यायची आहे. तर, श्रीनाथ भिमाले यांना सभागृह नेते पद स्वीकारून पावणे तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3