BNR-HDR-TOP-Mobile

Pune : दिपक आवळे यांना ‘स्टार्स ऑफ स्क्रिन’ पुरस्कार प्रदान

सिनेअभिनेता जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते मिळाला पुरस्कार

68
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – 4 थ्या कला संस्कृती परिवारातर्फे यंदा ‘स्टार्स ऑफ स्क्रिन’ पुरस्कार दिपक आवळे यांना प्रसिद्ध सिनेअभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला . त्यांच्या एका दशकाच्या कालखंडात सर्वोकृष्ठ प्रसिद्धीचे व्यवस्थापन कार्याचा आढावा घेवून आवळे यांना सन्मानित करण्यात आले.

.

याप्रसंगी जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, संजय ठुबे, अभिनेता अजिंक्य देव, दिपक निकम, ओंकार निकम, रणजीतसिंह मोहिते पाटील, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, उल्हासदादा पवार, वैभव जोशी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

पत्रकारिता बरोबर आवळे हे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक संस्थांचा प्रसिद्धी प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी आतापर्यंत 50 हून अधिक चित्रपटांचे प्रसिद्धी प्रमुख म्हणूनही काम पाहिले.

पुरस्कार मिळणे म्हणजे जबाबदारी वाढणे , या पुढे अजून मेहनत घेवून काम करीन असे आवळे यांनी सांगितले.

.

HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: