BNR-HDR-TOP-Mobile

Pune : पुणे रेल्वे स्थानकावर दुसरा सरकता जिना सुरु

एमपीसी न्यूज – मध्य रेल्वेच्या पुणे रेल्वे स्थानकावर दुसरा सरकता जिना सुरु करण्यात आला आहे. जिन्याचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. यामुळे प्रवाशांना जिना चढण्यासाठी यामुळे मदत होणार आहे.

पुणे रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी ताडीवाला रोड, आर. बी. मिल रोडच्या बाजूने दुसरे प्रवेशद्वार बनविण्यात आले आहे. या प्रवेश मार्गावर सुरुवातीला एक जिना करण्यात आला होता. मात्र, वृद्ध नागरिक, दिव्यांग, गरोदर महिला आणि रुग्णांना या जिन्यावरून जाण्यासाठी अडचण येत होती. याची रेल्वे प्रशासनाने दखल घेत सरकता जिना बसविण्याचा निर्णय घेतला.

सरकत्या जिन्याचे काम पूर्ण झाले असून याचे लोकार्पण देखील करण्यात आले आहे. हा जिना प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला आहे. या जिन्यावरून रेल्वे स्थानकावरील पादचारी मार्गावर जाता येईल. तसेच पादचारी मार्गावरून खाली देखील उतरता येणार आहे. याचा गरजू प्रवासी नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3