Pune : बिडी कारखाने त्वरित सुरू करा, भारतीय मजदूर संघांची मागणी

Start bidi factories immediately, demand of bhartiya majdur sangh : सरकारने रोजगार प्रधान बिडी व अन्य उद्योगातील कामगारांना रोजगार, वेतन व सामाजिक सुरक्षेची हमी द्यावी

एमपीसी न्यूज – लॅाकडाऊनचे कारण दाखवून बिडी कारखाने बंद आहेत. पण नाशिक, सोलापूर, अहमदनगर मधील अन्य कारखाने चालू आहेत. त्यामुळे बिडी कारखानेही त्वरित सुरू करण्याची मागणी भारतीय मजदूर संघाने केली आहे.

शासनाच्या चुकीचे आर्थिक व कामगार विरोधी धोरणनामुळे कामगारांमध्ये असुरक्षितता व भितीचे वातावरण निर्माण झाल असल्याचे भारतीय मजदूर संघाने म्हटले आहे.

भारतीय मजदूर संघांच्या वतीने जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी अखिल भारतीय बिडी मजदूर महासंघाचे सरचिटणीस उमेश विस्वाद, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सेक्रेटरी सचिन मेंगाळे, भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा सेक्रेटरी अर्जुन चव्हाण, चंद्रकला जाना, सुनंदा गरदास, लता मद्दी, मुर्तुजबी शेख आदि उपस्थित होते.

सरकारने रोजगार प्रधान बिडी व अन्य उद्योगातील कामगारांना रोजगार, वेतन व सामाजिक सुरक्षेची हमी द्यावी; अन्यथा बिडी कामगार सरकार विरोधात रस्ता वर उतरून आंदोलन करतील, असा इशारा अखिल भारतीय बिडी मजदूर महासंघाचे सरचिटणीस उमेश विस्वाद यांनी दिला.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘सरकार जगाओ आंदोलन’ प्रसंगी त्यांनी विविध मागण्या केल्या आहेत.

* या आहेत प्रमुख मागण्या

# अल्प उत्पन्न गटातील बिडी कामगारांना शासनाच्या वतीने घरकुल योजनेंअंतर्गत निवासाची व्यवस्था करावी.

# बिडी उद्योगाचे स्थलांतर थांबण्यासाठी राष्ट्रीय किमान वेतन जाहीर करावे.

# तेलंगणा शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने कामगारांना प्रतिमाह 5000 रूपये उदरनिर्वाह भत्ता सुरू करावा.

# बिडी उद्योग पारंपारिक व कुटीर उद्योग असल्याने या मध्ये करोडो महिला कामगार काम करित आहेत. त्यांच्यासाठी शासनाने रोजगार रक्षणासाठी स्वंतत्र धोरण निश्चित करावे.

# सामाजिक सुरक्षा कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी स्वंतत्र यंत्रणेमार्फत लाभ देण्यात यावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.