Pune : वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय परिसरात कोरोना स्वॅब सेंटर सुरू करा : दिपाली धुमाळ

Start Corona Swab Center at Warje Karvenagar Regional Office Area: Deepali Dhumal

एमपीसी न्यूज – वारजे कर्वेनगर परिसरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने दिवसेंदिवस कोरोना पाॅझीटिव्ह रूग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे या भागात तातडीने स्वॅब सेंटर सुरू करण्यात यावे, अशी मागणी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ यांनी केली आहे.

वारजे – कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत कोरोना रुग्णांची संख्या आता दोनशेच्या पुढे गेली आहे. आठ दिवसांतच 100 रुग्ण वाढले आहेत.

त्यामुळे वारजे – कर्वेनगर, शिवणे – उत्तमनगर परिसरातील नागरिकांनी अधिक सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे. तर, पाच नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

तसेच 63 पेक्षा अधिक नागरिक कोरोनातून बरे झाले आहेत. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

पाॅझीटिव्ह रुग्ण आढळला की त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना स्वॅब तपासणीसाठी ताब्यात घेतले जाते, त्यांचीही संख्या रोजच्या रोज वाढत आहे.

या सर्व व्यक्तींना धायरीतील धायगुडे हाॅस्पिटल व सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये न्यावे लागते. तेथेही तपासणीसाठी मर्यादा आहे. यासाठी स्वॅब सेंटर वाढविणे गरजेचे आहे.

मर्यादित क्षमता असल्याने या केंद्रावर ताण येत आहे. यासाठी प्रत्येक भागात स्वॅब सेंटरची संख्या वाढविणे गरजेचे आहे. म्हणूनच वारजे कर्वेनगर परिसरामध्ये स्वतंत्र स्वॅब सेंटरची आवश्यकता असल्याचे धुमाळ यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.