Pimpri : कामगारांसाठी PMPML बस सेवा सुरु करा – गोविंद पानसरे

एमपीसी न्यूज – सरकारने 33% टक्के कामगारांसह लघु व मध्यम उद्योग सुरु करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, दुचाकी वापरण्यास कामगारांना बंदी करण्यात आली आहे. सध्या लॉकडाऊनमुळे इतर सार्वजनिक वाहने कामगारांसाठी उपलब्ध नाहीत.

यासाठी औद्योगिक क्षेत्रात PMPML बस सेवा सुरु करावी, अशी मागणी पुणे जिल्हा औद्योगिक विकास मंडळ अध्यक्ष गोविंद पानसरे यांनी केली आहे.

याबाबत PMPMLच्या व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड भागातील औद्योगिक क्षेत्रामध्ये पुरुष कामगारांबरोबर महिलांची संख्या लक्षणीय आहे.

सध्या लॉकडाऊनमुळे इतर सार्वजनिक वाहने कामगारांसाठी उपलब्ध नाहीत. लघु व मध्यम उद्योजक वाहन सुविधा उपलब्ध करण्यास आर्थिकरित्या सक्षम नाहीत. त्यामुळे महिला व कामगारांची मोठी गैरसोय होत आहे.

संघटना व मराठा चेंबर ऑफ कॉमर्स पूर्ण सर्व्हे करुन कामगारांची संख्या, ब्लॉकवाईस मार्गाचा नकाशा पिंपरी व चिंचवड भागातील पूर्ण तपशीलवार माहिती नकाशासहित पीएमपीएलएमच्या सर्व अधिकार्‍यांना दिलेली आहे.

आत्पकालीन परिस्थितीत या मागणीस न्याय द्यावा, अशी मागणी पानसरे यांनी निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III