Pune : पुण्यात कोरोना चाचणी क्षमता वाढविण्याबाबत राज्य शासनाचे दुर्लक्ष : देवेंद्र फडणवीस

State government neglects to increase corona testing capacity in Pune: Devendra Fadnavis

एमपीसी न्यूज – पुण्यात कोरोना चाचणी क्षमता वाढविली पाहिजे. मात्र, राज्य शासनाचे पुण्याकडे दुर्लक्ष होत आहे, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर आज, मंगळवारी जोरदार हल्लाबोल केला.

फडणवीस यांनी पुणे आणि पिंपरी – चिंचवड परिसरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पुण्यात आयोजित पत्रकार पसिषदेत राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.

फडणवीस म्हणाले, जेवढ्या जास्त कोरोना टेस्ट होतील, तेवढे रुग्ण समोर येणार आहेत. पुढील दोन महिने बेड आणि ऑक्सिजनची गरज लागणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेला लॉकडाऊन हा काही कायमस्वरूपी उपाय नाही. लॉकडाऊन काळात मास्क, सोशल डिस्टन्सची नागरिकांना माहिती मिळाली. लॅबही तयार झाल्या. आता अर्थव्यवस्था मूळ पदावर आणून लोकांचे जीवन सुकर करावे लागणार आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाचे चांगले प्रयत्न सुरू आहेत.कोरोनाची नागरिकांमध्ये जागरूकता वाढत असल्याचे फडणवीस म्हणाले.

कोणाचे मूल्यमापन करण्याची ही वेळ नाही. दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी आमच्या सोबत येण्यास तयार होती. पण, आमच्या सर्वोच्च नेत्यांनी शिवसेना सोबत हवी असल्याचे सांगितले होते. त्यामुळे ते प्रकरण थंड पडल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

दिल्लीत कोरोनाच्या चाचण्या वाढतायेत, मग पुणे – मुंबईत का नाही ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आज सरकार बदलणे हा आमचा हेतू नाही. हे सरकार कधी पडेल ते सांगावे लागणार नाही, असे सांगायलाही फडणवीस विसरले नाहीत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.