Pune : महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी राज्य शासन सकारात्मक

एमपीसी न्यूज – गेल्या काही महिन्यांपासून राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवून रखडलेल्या पुणे शहरातील वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न मार्गी लागणार आहेत, असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी पुण्यात दिले.

2017 च्या महापालिकेच्या अंदाजपत्रकात तत्कालीन स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी या योजनेची घोषणा केली होती. आपले स्वतःचे वैद्यकीय महाविद्यालय होणार असल्याचे पुणेकरांमध्येही आशा निर्माण झाली होती.

स्व. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने हे महाविद्यालय असेल. सध्या जगभरात ‘कोरोना’ रोगाने थैमान घातले आहे. हजारो जीव जात आहेत. पुण्यातही त्याचे रुग्ण आढळले. त्यामुळे हे महाविद्यालय तातडीने होण्याची गरज असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

तर, पुणे महापालिकेत, राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असताना आतापर्यंत हे महाविद्यालय करण्यासाठी का पाठपुरावा केला नाही, असा सवाल शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी उपस्थित केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.