Pune: राज्य सरकार, पुणे, पिंपरी पालिका, पीएमआरडीए COEP COLLGE च्या मैदानावर करणार 1 हजार बेडची निर्मिती

State Government, Pune, Pimpri Municipality, PMRDA will construct 1000 beds on the grounds of COEP COLLGE : ही सुविधा संपूर्ण पुणे जिल्ह्यातील रुग्णांसाठी असणार आहे.

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता प्रशासनाने एकत्रितपणे उपाययोजना हाती घेतल्या आहेत. शिवाजीनगर येथील इंजिनिअरिंग कॉलेज (सीओइपी) च्या मैदानावर राज्य सरकार, पुणे, पिंपरी-चिंचवड पालिका, पीएमआरडीय आणि जिल्हाधिकारी कार्यालय एकत्रितपणे ऑक्सीजन, आयसीयू बेडची सुविधा असलेल्या 1 हजार बेडची निर्मिती करणार आहे. जिल्ह्यातील रुग्णांवर येथे उपचार केले जाणार आहेत.

याबाबतची माहिती पिंपरी पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना दिली.

पुणे जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. रुग्णवाढीच्या शहरात पुण्याचा वरचा क्रमांक होऊ लागला आहे. भविष्यातील रुग्णवाढीचा अंदाज घेऊन जम्बो सुविधांची निर्मिती करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

त्यानुसार पुणे शहर, ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णांसाठी इंजिनिअरिंग कॉलेजच्या मैदानावर 1 हजार बेडची निर्मिती केली जाणार आहे.

आयुक्त हर्डीकर म्हणाले, राज्य सरकार, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए ) आणि जिल्हाधिकारी कार्यालय एकत्रितपणे पुण्यातील इंजिनिअरिंग कॉलेज (सीओइपी)) च्या मैदानावर सुविधा निर्माण करणार आहेत.

याठिकाणी 1 हजार बेडची अधिकची सुविधा निर्माण केली जाणार आहे. त्यामध्ये आयसीयूचे 200 आणि ऑक्सीजनचे 800 बेड असणार आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील काही रुग्णांवर तिथे देखील उपचार केले जाणार आहेत. ही सुविधा संपूर्ण पुणे जिल्ह्यातील रुग्णांसाठी असणार आहे.

त्याचा अंदाजे 100 कोटी खर्च आहे. त्यात 50 कोटी निधी राज्य सरकार देईल. तर, पुणे, पिंपरी महापालिका, पीएमआरडीए आणि जिल्हाधिकारी कार्यालय उर्वरित 50 कोटीचा निधी विभागून देणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.