Pune: जम्बो कोविड सेंटर उभारण्यासाठी राज्य शासनाने अर्थसहाय्य करावे- हेमंत रासने 

Pune: State government should provide financial assistance for setting up Jumbo Covid Center: Hemant Rasne

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका जम्बो कोविड सेंटर उभारण्यासाठी पुढाकार घेत आहे. महापालिकेने आतापर्यंत 250 कोटी रुपये खर्च केले आहेत. महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असून जंबो कोविड सेन्टर उभारण्यासाठी राज्य शासनाने अर्थ सहाय्य करावे, अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी केली आहे. 

पुणे शहरात कोरोनाचे अभूतपूर्व असे संकट निर्माण झाले आहे. हे संकट कमी करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी – कर्मचारी रात्रंदिवस जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 49 हजार 217 रुग्ण झाले आहेत. सक्रिय रुग्णसंख्या 18 हजार 546 आहे. तर, 24 हजार 489 रुग्णांनी वेळीच उपचार घेऊन कोरोनावर मात केली आहे.

कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्याने रुग्णवाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही. कोरोना रुग्णांना चांगले उपचार करण्यासाठी जंबो कोविड सेन्टर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने मदत करण्याची अपेक्षा हेमंत रासने यांनी व्यक्त केली आहे. कोरोनाच्या संकटामुळे महापालिकेच्या उत्पन्नातही घट झाली आहे. अनेक विकासकामे सध्या बंद आहेत. तरीही या काळात उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.