Pune : राज्यस्तरीय माळी समाजातील वधू वर परिचय मेळावा उत्साहात

एमपीसी न्यूज – महात्मा फुले माळी वधू वर सूचक मंडळाच्यावतीने राज्यस्तरीय माळी समाजातील वधू वरांचा परिचय मेळावा उत्साहात संपन्न झाला.

या परिचय मेळाव्याचे उदघाटन माजी आमदार कमल ढोले पाटील व लग्न जुळलेल्या जोडीकडून दीपप्रज्वलन करून करण्यात आले. संत सावतामाळी महाराज, महात्मा जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी दीपक कुदळे , दीपक जगताप, ऍड. दिगंबर आलाट उपस्थित होते .

या मेळाव्याचे संयोजन महात्मा फुले माळी वधू वर सूचक मंडळाचे अध्यक्ष नानासाहेब कुदळे व आशा नानासाहेब कुदळे यांनी केले. या मेळाव्यामध्ये १३० वर व १७० वधुनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.