Pune : मनसेच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्याकडून जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे (Pune) अध्यक्ष राज ठाकरे हे अनधिकृत बांधकामाबाबत महापालिका प्रशासनाला धारेवर धरत असताना मावळ मनसेमध्ये मात्र अनधिकृत बांधकाम प्रकरणी मनसेच्या एका राज्यस्तरीय पदाधिकाऱ्याने मनसेच्याच जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

 

मनसेचे पुणे जिल्ह्याचे रस्ते साधन सुविधा व अस्थापनाचे जिल्हा उपाध्यक्ष किरण परशुराम गवळी यांनी थेट राज ठाकरे यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. गवळी यांनी त्यांच्या जिवाला एका मनसे पदाधिकाऱ्याकडून धोका असल्याचा आरोप केला आहे.

 

गवळी यांनी राज ठाकरे यांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे की, तळेगाव दाभाडे येथील कृष्णा आकार सोसायटी अनधिकृत बांधली आहे. याची माहिती मिळताच गवळी यांनी याबाबत माहिती काढून पुढील कारवाईसाठी हालचाली केल्या. याचा राग मनसेचे रस्ते साधन सुविधा सेलचे राज्य उपाध्यक्ष सचिन भांडवलकर यांना आला. भांडवलकर यांनी दारुच्या नशेत गवळी व त्यांचे साथीदार सामाजिक कार्यकर्ते सचिन देशपांडे, महाराष्ट्र माहिती अधिकार महासंघ सचिव प्रदीप नाईक यांना कृष्णा सोसायटी विरोधातील काम थांबवा नाही तर हात पाय तोडून टाकीन, अशी धमकी दिली होती.

Pune : सरकारने शाळांमध्ये किमान एक तरी कला अनिवार्य करावी – मनोज वाजपेयी

त्यानंतर गवळी हे मनसेच्या गुढी पाढव्या मेळाव्याला गेले होते. यावेळी सभेनंतर परतत असताना गवळी यांना माहिती मिळाली की, कृष्णा आकार सोसायटीचे प्रसन्न आंधळे व सचिन भांडवलकर हे रस्त्यात गाठून गवळी यांना मारणार आहेत. भांडवलकर हे गवळी यांच्या बसचा पाठलाग करत होते. ते सतत देहूरोड शहराध्यक्ष सुरेश सिंघानिया व महिला विभागाच्या मावळ तालुका अध्यक्षा ज्योती पंजन यांना फोन करून बस थांबवा मला गवळीला मारायचे आहे. बस नाही थांबवली तर मी बसची तोडफोड करेन, ज्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल, अशी धमकी दिल्याचा (Pune) आरोप गवळी यांनी केला आहे.

 

या प्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात गवळी व प्रदीप नाईक यांनी भांडलवकर यांच्या विरोधात तक्रार करत सुरक्षेची मागणी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.