Pune : विधानसभा निवडणुकीतील नगरसेवकांच्या कामगिरीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील असमाधानी; लवकरच पदाधिकारी बदलणार

एमपीसी न्यूज – भाजपचा हडपसर आणि वडगावशेरी मतदारसंघांतील पराभव अक्षरशः जिव्हारी लागला आहे. या दोन्ही मतदारसंघांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्र आहे. दोन वेळ चांगले पाणी न दिल्यानेच पराभव झाल्याचा ठपका नगरसेवक प्रशासनावर ठेवत आहे. तर, इतर पक्षातून भाजपमध्ये प्रवेश करून नगरसेवक झालेल्यांनी काम केले नसल्याची ओरड होत आहे. या सर्व बाबींचा अभ्यास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील करीत आहेत.

एकंदरीतच पुणे महापालिकेतील पदाधिकारी आणि भाजपच्या नगरसेवकांच्या कारभारावर पाटील असमाधानी असल्याची कुजबूज आहे. त्यामुळे महापालिकेतील पदाधिकारी लवकरच बदलण्यात येणार असल्याची चर्चा आहे. 24 बाय 7 समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणी देणार असल्याच्या केवळ घोषणाच सुरू आहेत. प्रत्यक्षात शुद्ध आणि 24 तास नागरिकांना पाणी कधी मिळणार? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

चांदणी चौक उड्डाणपुलाचे कामही संथगतीने सुरू आहे. बिडीपीच्या 50 एकर जागेवर महापालिकेची भव्य अशी शिवसृष्टी उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पण, त्याला काही गती नाही.

पुणे महापालिकेत भाजपचे 98 नगरसेवक आहेत. सर्वांनाच सत्तेत वाटा हवा आहे. समाविष्ट गावांमध्येही विकासकामे होत नसल्याने गावकऱ्यांची ओरड सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.