Pune : कंत्राटी वीज कामगारांचे आजपासून राज्यव्यापी काम बंद आंदोलन

Statewide work stoppage agitation of contract power workers from today:रास्ता पेठ येथील महावितरणच्या कार्यालयासमोर सरकार विरोधात घोषणाबाजी

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतील नोकर भरतीबाबत कंत्राटी कामगारांच्या कंपनी व्यवस्थापनाबरोबरील चर्चा निष्फळ झाल्याने महाराष्ट्र राज्य कंत्राटी विज कामगार संघाच्या कंत्राटी कामगारांनी आज, मंगळवारपासून राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या बंदमध्ये राज्यातील सुमारे 22 हजार कंत्राटी कामगार सहभागी झाले आहेत.

विविध मागण्यासंदर्भात तिन्ही वीज कंपनीच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा निष्फळ ठरल्याने कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या रोजगार आणि अन्य विविध समस्यांना घेऊन महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

पुण्यातील रास्ता पेठ येथील महावितरणच्या कार्यालयासमोर या कंत्राटी कामगारांनी सरकार विरोधात घोषणा देऊन आंदोलनाला सुरुवात केली.

कंत्राटदार विरहित शास्वत रोजगाराची हमी आणि सुरक्षा कंपनीने द्यावी, चालू भरती प्रक्रियेत बदल व्हावेत, भरतीमध्ये वर्षानुवर्षे रिक्त पदांवर काम करणाऱ्या अनुभवी कंत्राटी कामगारांना प्राधान्य मिळावे, अशा मागण्या संघटनेच्यावतीने करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे संघटन मंत्री राहुल बोडके यांनी दिली.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.