Pune : सराफा दुकानात दागिने चोरणाऱ्या पुण्यातील तीन महिलांना अटक

एमपीसी न्यूज : हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानात पाच मे रोजी चोरी झाली होती. दागिने खरेदी करण्यासाठी आलेल्या तीन महिला आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या एका लहान मुलीने दुकानातील कामगारांची नजर चुकवून ही चोरी केली होती. (Pune) हडपसर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल होता. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत चोरी करणाऱ्या तीनही महिलांना अटक केली आहे. 

सविता मनोज चव्हाण (वय 47, शिवराम दादा तालीम जवळ गणेश पेठ पुणे), वर्षा योगेश चव्हाण (शनी मंदिराशेजारी चव्हाण नगर पुणे) आणि स्नेहा शैलेंद्र पवार (वय 25 कृष्णा नगर मोहम्मद वाडी) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. तर एका अल्पवयीन मुलीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Jayant Patil : “निवडक लोकांमुळे संपूर्ण पोलीस दल बदनाम”, अमोल कोल्हेंच्या त्या आरोपावरून जयंत पाटलांचा निशाणा

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी महिला पाच मे रोजी भेकराईनगर परिसरातील लक्ष्मी ज्वेलर्स मध्ये गेल्या होत्या. दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने त्यांनी दुकानात 12 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरले होते. या महिलांसोबत असणाऱ्या अल्पवयीन मुलीने हात चलाकिने दागिने चोरून जीन्स पॅन्ट मध्ये लपवले होते. (Pune)  दुकानात असणाऱ्या आरशातून सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये हा सर्व प्रकार कैद झाला होता. त्यानंतर पोलिसांनी 50 फूल अधिक सीसीटीव्ही च्या आधारे हडपसर ते पद्मावती असा प्रवास करून आरोपी महिलांना अटक केली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.