Pune : कानाच्या पडद्यावर बिनटाक्याची शस्त्रक्रिया यशस्वी

एमपीसी न्यूज – पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड येथे कानाच्या पडद्याच्या आजारासंदर्भातील कानाच्या पडद्यावरील बिनटाक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. अशा प्रकारची ही पहिली शस्त्रक्रिया असल्याची माहिती नामवंत कान, नाक, घसाचे तज्ञ डॉ. सूरज गिरी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

कानाच्या आजारासंदर्भात लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात अज्ञान आणि गैरसमज असून अनेक वेळा या आजाराकडे दुर्लक्षच केले जाते. काही वेळा तपासण अंती रुग्णाच्या कानाच्या आतील भागास असलेल्या पडद्यास इजा झालेली असते व पडद्याचा भाग फुटला किंवा तुटला असेल तर शस्त्रक्रिया हा उपाय असतो. पन्नास वर्षाच्या प्रेमदेवी चौधरी (रा. पिंपरी) या महिलेस देखील कानात सतत दुखत होते. गेली तीन वर्ष त्या हा त्रास सहन करीत होत्या. कानांत मळ असल्याचे सांगून डॉक्टरकडून औषधोपचार चालू होते. काही डॉक्टरांनी ऑपरेशनचाही सल्ला दिलेला होता. पण गैरसमजापोटी ऑपरेशन टाळले होते. डॉक्टर सूरज गिरी यांनी तपासणी करुन या शस्त्रक्रियेची माहिती दिली.

याबाबत माहिती देताना डॉ. सूरज गिरी म्हणाले, “आजही आधी रुग्णाच्या कानावर छेद घेऊन मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी शस्त्रक्रिया केली जाते. पण पहिल्यांदाच या तत्रज्ञानाचा वापर करुन पुण्यामध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची जलद सुधारणा होते. रुग्णाच्या वेदना संपूर्णत जातात. या पत्रकार परिषदेस रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण जोशी आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.