Pune: स्विफ्ट गाडीतून साडेपाच लाखांचा दारूचा साठा जप्त, एकाला अटक

Pune: Stocks of liquor seized from Swift car, one arrested पोलिसांनी गाडी बाजूला घेण्यास सांगून या झडती घेतली असता गाडीत देशी-विदेशी मद्याचे तब्बल 17 बॉक्स सापडले.

एमपीसी न्यूज- शिक्रापूर पोलिसांनी एका गाडीतून देशी आणि विदेशी दारूचा तब्बल साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. हा सर्व प्रकार बुधवारी मध्यरात्री घडला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, चारचाकी गाडीतून एक व्यक्ती दारूचे बॉक्स घेऊन जाणार असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शिक्रापूर पोलिसांच्या एका पथकाने सणसवाडी रस्त्यावर सापळा रचला होता.

त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास एक पांढ-या रंगाची स्विफ्ट संशयास्पदरित्या येताना पोलिसांच्या पथकाला दिसली. पोलिसांनी गाडी बाजूला घेण्यास सांगून या झडती घेतली असता गाडीत देशी-विदेशी मद्याचे तब्बल 17 बॉक्स सापडले. पोलिसांनी गाडी आणि दारूचे बॉक्स असा एकूण साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शिक्रापूर पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून गाडीच्या चालकाला ही अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.