BNR-HDR-TOP-Mobile

Pune : पुण्याची पाणी कपात तूर्तास टळली; दहा दिवसांनी घेणार फेर आढावा

एमपीसी न्यूज – धरणातील पाणीसाठा लक्षात घेता नियमितपणे पाणीपुरवठा केला जाणार आहे. पुन्हा आठ ते दहा दिवसांनी फेर आढावा घेतला जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली आहे.

पुण्याच्या पाणी कपातीसंदर्भात आयुक्तांसोबत गिरीश बापट यांची बैठक झाली. याबाबत त्यांनी सांगितले की, यात पाण्याच्या तातडीच्या योजना काय करता येतील त्यावर चर्चा केली. पुण्याबाहेरील जनावरे पुण्यात आणता येतील का?, चारा छावण्या तयार करता येतील का? यावर चर्चा करण्यात आली. तसेच पुण्यातला पाणीपुरवठा आहे तसाच सुरूच ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्यावरील पाणी कपातीचे संकट तात्पुरते टळले आहे. मात्र, काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहनही केले आहे.

  • पिंपरी-चिंचवड शहरालादेखील सहा मे पासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय गुरुवारी (२ मे) घेतला आहे. त्यामुळे पुणे शहरातही पाणी कपात होणार यांची चाहूल लागली होती. मात्र, आता पुण्यातील पाणी कपातीचे संकट तूर्तास टळले आहे, असेच चित्र आहे.
HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3