Pune: शहरातील विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यात जाण्याची व्यवस्था करावी : महापौर

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यात जाण्यासाठी व्यवस्था करावी, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना बाबत आढावा घेण्यासाठी दिनांक 25 एप्रिल रोजी बैठक झाली होती. त्या बैठकीत महापौर मोहोळ यांनी या विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी व्यवस्था करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार अजित पवार यांनी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वय साधून या विद्यार्थ्यांना पाठविण्याचे आदेश दिले होते, अशी आठवणही महापौर मोहोळ यांनी जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या पत्रात करून दिली आहे.

त्यामुळे या विद्यार्थ्यांना तातडीने त्यांच्या जिल्ह्यात पाठविण्यात यावे. त्याची प्रक्रिया जाहीर करावी. त्यानुसार या विद्यार्थ्यांना माहिती देऊन ते त्यांच्या गावी जाऊ शकतील, असेही महापौरांनी म्हटले आहे. दरम्यान, या विद्यार्थ्यांकडे आता होते नव्हते ते संपले आहे. त्यांना पालकांकडून पैसे येत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या अडचणीही वाढल्या आहेत. या विद्यार्थ्यांनीही गावाकडे जाऊ देण्याची मागणी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.