Pune : विद्यार्थ्यांनी प्रदर्शातून केला चमत्कारिक तंत्रज्ञानाचा उलगडा

एमपीसी न्यूज : चित्रपटातील व्हीएफएक्स (Pune) आणि त्यातील व्हिज्युअल इफेक्ट्स या तंत्रज्ञानामुळे बाहुबली, आरआरआर सिनेमांची भुरळ सर्वांनाच पडली आहे. वेगवेगळे ग्राफिक्स आणि व्हीएफएक्सच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे हे सिनेमे एका उंचीवर गेले आहेत.

ऐतिहासिक, पौराणिक, चमत्कारिक किंवा ऍक्शन फिल्म्स,ॲनिमेशन चित्रपटात व्हीएफएक्स वापरले जाते. चित्रपटातच नाही तर हे तंत्रज्ञान, जाहिराती, कार्टून, मालिकामध्येही वापरले जाते. हे तंत्रज्ञान कशा पद्धतीने काम करते? यातील चमत्कारिक गोष्टींचा उलगडा पुण्यातील फ्रेमबॉक्स ॲनिमेशनॲन्ड व्हीएफएक्स इन्स्टिटयूट कोथरूड, या विद्यार्थ्यांनी केला. कोथरूड येथील फ्रेमबॉक्स इन्स्टिटयूटमध्ये गेमिंग आणि 3डी व्हीएफएक्स या संकल्पनेवर आधारित”स्किलबॉक्स आर्ट” चे प्रदर्शन नुकतेच पुणेकरांना पाहायला मिळाले.

Pune : 27 मे रोजी होणार स्वराज्य संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन

यावेळी फ्रेमबॉक्स कंपनीच्या उपाध्यक्षा विनिता बचानी, कोथरूड शाखेच्या संचालिका संगीता वाघ, संचालक धर्मराज वाघ व संकेत वाघ यावेळी उपस्थित होते. या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी स्पायडर मॅन, मारिओ, जंगलबुक मोगली साकारला. जंगल आणि जंगलातले प्राणी यांचे हुबेहूब प्रतिबिंब संस्थेमध्ये विद्यार्थ्यांनी साकारले होते. त्याचबरोबर डिश पेंटिंग, इलूष्ट्रेशनद्वारे केलेली चित्रकला, अगदी मोहकरूपात साकारण्यात आल्या होत्या.

 

संचालक धर्मराज वाघ म्हणाले की, “चित्रपटांना अधिक विश्वासार्ह आणि मनोरंजक बनवण्याचा मार्ग म्हणून सिनेमाच्या सुरुवातीच्या काळापासून व्हिज्युअल इफेक्ट्सचा वापर केला जात आहे. आजचे चित्रपट निर्माते त्यांचा उपयोग केवळ त्यांच्या मनोरंजनासाठीच नव्हे तर शब्दांचा वापर न करता चित्रपटाद्वारे कल्पना आणि संदेश देण्याचे साधन म्हणून करतात.

व्हिज्युअल इफेक्ट्स किंवा थोडक्यात व्हीएफएक्स ही एक आभास निर्माण करण्यासाठी चित्रपट निर्मितीमध्ये विविधतंत्रे वापरण्याची कला आहे. या कलेचे प्रशिक्षण फ्रेमबॉक्स इन्स्टिटयूट कोथरूडमध्ये आम्ही गेली 15 वर्षे अविरतपणे करत आहोत.

विनिता बचानी म्हणाल्या की, एखादे दृश्य चित्रित करताना जर ते कॅमेऱ्यात शूट करणे अशक्य असेल, खर्चिक होत असेल किंवा धोकादायक असेल त्यासाठीव्हीएफएक्स हे तंत्रज्ञान वापरतात.

मोठे बॉम्बस्फोट, जुन्या काळातील सेट/भविष्यकालीन सेट तयार करण्यासाठी, गाड्यांचे स्टंट दाखवण्यासाठी, सुपर पॉवर दाखवण्यासाठी, विज्ञान कथा, अ‍ॅनिमेशनचित्रपटांसाठी व्हिज्युअल इफेक्टसचाचा मोठा वाटा असतो. भारतीय चित्रपटातील या स्पेशल इफेक्ट्सने हॉलिवूडच्या तंत्रज्ञांनी मागे सारले आहे. भारतातीलकिंबहुना जगभरात असलेल्या या क्षेत्रातील संधी काय आहेत या संबंधी या प्रदर्शनातून माहिती देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.