Pune : बेडसची अद्ययावत माहिती तातडीने सादर करा : महापौरांच्या आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांना सूचना

Submit updated information of beds immediately: Notice to Mayor's Commissioner, Additional Commissioner

एमपीसी न्यूज – व्हेंटिलेटर न मिळाल्याने निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. पी. लक्ष्मी नरसिंह यांचा मृत्यू झाला. या घटनेची महापौर मुरलीधर मोहोळ यांनी गंभीर दखल घेतली आहे. शहरातील डॅशबोर्डवरील बेडच्या संख्येतील तफावत, बेड मिळत नसल्याच्या तक्रारी आणि व्हेंटिलेटर अभावी निवृत्त शास्त्रज्ञाचा झालेला मृत्यू याविषयावर महापौरांनी आयुक्त विक्रम कुमार आणि अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्याशी संवाद साधत अद्ययावत माहिती तातडीने सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.

महापौर मोहोळ स्वतः कोरोनाशी लढा देत असून ते विलगीकरणात आहेत. तरीही गेल्या काही दिवसात वाढलेल्या तक्रारीचा ओघ लक्षात घेत महापौर मोहोळ यांनी आढावा घेत कामाला पुन्हा एकदा सुरुवात केली आहे.

गेल्या काही दिवसात डॅशबोर्डवरील बेड संख्या आणि प्रत्यक्ष बेडची संख्या यामध्ये मोठ्या तफावत जाणवत आहे. डॅशबोर्डवर व्हेंटिलेटर बेड उपलब्ध आहेत. पण प्रत्यक्षात संपर्क साधल्यानंतर बेड्स उपलब्ध नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

तसेच शहरातील निवृत्त शास्त्रज्ञाचा व्हेंटिलेटर वेळेत न मिळाल्यामुळे मृत्यू झाला.

त्यासंबंधी शहरातील सध्याची बेडची स्थिती, होम आयसोलेशन रुग्णांची संख्या, कोविड केअर सेंटर मधील बेडची संख्या, व्हेंटिलेटर व अतिदक्षता विभागातील बेडची संख्या तसेच खाजगी रुग्णालयांची नेमक्या बेडसची माहिती नाही. ही सर्व माहिती घेऊन त्या अद्यावत करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या.

तसेच मागील दोन आठवड्यात यासंबंधी केलेल्या उपाययोजनांचा अहवाल महापौरांनी आयुक्तांना मागविला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.