Pune : कोरेगाव भीमा येथे भीमा नदीत आत्महत्या केलेल्या मायलेकींचे मृतदेह बाहेर काढण्यात यश

एमपीसीन्यूज : कोरेगाव भीमा ( ता. शिरूर) येथे मायलेकीने भिमा नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. रविवारी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. आज, सोमवारी सकाळी मायलेकीचा मृतदेह शोधण्यात यश आले.

सपना कसबे ( वय -२५) असे मृत महिलेचे नाव आह. सपना यांनी आपल्या तीन वर्षाच्या छोट्या मुलीला ओढणीच्या सहाय्याने कंबरेला बांधून पुणे-नगर महामार्गावरील भीमा नदीवरील पुलावरून नदीत पाण्यात उडी मारली.

यात या महिलेचा व तिच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज सकाळी या मायलेकीचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

अधिक तपास शिक्रापूर पोलिस करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like