Pune : एम.डी. एस.परीक्षेत ‘एम.ए. रंगूनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेस’चा शंभर टक्के निकाल

एमपीसी न्यूज- एम.डी. एस.परीक्षेत ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘एम.ए. रंगूनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेस’चा निकाल शंभर टक्के लागला आहे.

नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतलेल्या या परीक्षेत रंगूनवाला दंत महाविद्यालयाचे सर्व ४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
‘मुखरोग निदान दंतशास्त्र’ विभाग मध्ये याच महाविद्यालयाच्या डॉ. अश्विनी पै या विद्यार्थिनीने प्रथम येऊन सुवर्णपदकाचा मान मिळवला आहे. तर डॉ. श्रद्धा सुपनेकर या विद्यार्थिनीने रौप्यपदक पटकावून विद्यापीठात तृतीय क्रमांक मिळवला. ‘मुखरोग निदान दंतशास्त्र’ विभाग प्रमुख डॉ . कृष्णा कुमार आणि डॉ. निखिल दिवाण यांचे विद्यार्थिनींना मार्गदर्शन लाभले.

‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार, रंगूनवाला दंत महाविद्यालयाच्या प्राचार्य रमणदीप दुग्गल, रजिस्ट्रार आर.ए. शेख यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.