Pune : ज्येष्ठ नृत्यांगना सुचेता भिडे-चाफेकर यांचा अरुण फिरोदिया यांच्या हस्ते सत्कार

एमपीसी न्यूज- ज्येष्ठ भरतनाट्य नृत्यांगना श्रीमती सुचेता भिडे -चाफेकर यांच्या योगदानाबद्दल सत्कार ज्येष्ठ उद्योजक आणि भारतीय विद्या भवन, पुणे केंद्र समितीचे उपाध्यक्ष अरुण फिरोदिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. चाफेकर यांनी नुकतेच सत्तरीत पदार्पण केले आहे.

यावेळी भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे , मुक्तांगण विज्ञान शोधिकेचे मानद संचालक अजित भिडे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ श्रीमती विजयम कर्था इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

अरुण फिरोदिया म्हणाले, “सुचेता भिडे -चाफेकर यांनी जीवनभर कलेची सेवा केली आहे. त्यांचे मार्गदर्शन नव्या पिढीला घडत राहो. भारतीय विद्या भवनला त्यांनी कलेचे मार्गदर्शन करावे”

सुचेता भिडे-चाफेकर म्हणाल्या,”नृत्याला संगीताची जोड असेल तरच ते अजरामर होते. नवी पिढी जुन्या परंपरेचा वारसा घेऊन पुढे जात आहे, ही चांगली बाब आहे. माझे गुरु पार्वतीकुमार यांच्यामुळे महाराष्ट्रात शास्त्रीय नृत्य परंपरा सुरु झाली. ती पुढे नेली पाहिजे. या सत्काराबद्दल मी कृतज्ञ आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.