Pune : माय माउली ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या नूतन अध्यक्षपदी सुधाकर देशमुख

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे, नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शंकरराव शेळके यांनी स्थापन केलेल्या माय माउली ज्येष्ठ नागरिक महासंघ मावळच्या नूतन कार्यकारिमी सदस्यांची सभा आज शुक्रवारी (दि.10) सकाळी ठीक साडेदहा वाजता घेण्यात आली. सुधाकर देशमुख यांची नूतन अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच या सभेत सन २०१९-२० ते २०२०-२१ या द्वैवार्षिक कालावधीसाठी एकूण ८० सदस्यांची कार्यकरिणी सदस्य पदी निवड करुन नावे घोषित करण्यात आली. 

या संघाचे आजमितिस जवळ जवळ १८००० सभासद आहेत. या सभेचे अध्यक्ष स्थान विद्यमान अध्यक्ष नामदेवराव डफळ यांनी भुषविले. सभेस सुधाकरजी शेळके व सुदामजी शेळके बंधू उपस्थित होते.

सदस्यांच्या निवडीनंतर नूतन अध्यक्षपदासाठी सभेत सांगोपांग चर्चा, विचार विनिमय होऊन सुधाकर देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आली. गणपतराव काळोखे गुरूजी यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव सादर केला. तर पांडुरंग भेगडे यांनी त्यास अनुमोदन दिले. सभेचे कामकाज अत्यंत खेळीमेळीच्या वतावरणात पार पडले.

त्यानंतर काळोखे गुरूजी, पांडुरंग भेगडे, बबनराव शेटे, विट्ठल कांबळे, दीपक जयवंत व समन्वयक सुधाकर रेंभोटकर यांनी नामदेवराव डफळ यांच्या कार्याचा गौरव करुन व सुधाकर देशमुख नूतन अध्यक्षांचे अभिनंदन करुन उभयतांचा उद्योजक शंकरराव शेळके, सुधाकर शेळके व ज्येष्ठ सदस्य गणपतराव काळोखे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. चहापान व पसायदानाने व आलेल्या सदस्याचे आभार मानून सभा संपल्याचे घोषित करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.